विश्वाचा व्यापक
विश्वाचा व्यापक
विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी ।
नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥
नवल गे माय नवल गे माय ।
चोरुनियां खाय नवनीत ॥२॥
धरिती बांधती गौळणी बाळा ।
वोढोअनि सकळां आणिताती ॥३॥
एका जनार्दनीं येतो काकुलती ।
न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥