STORYMIRROR

Rajendra Bhoiwar

Classics

2  

Rajendra Bhoiwar

Classics

जाणते नेणते होतु

जाणते नेणते होतु

1 min
13.5K


जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी ।

तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥

सुलभ सोपारे गोकुळामाझारीं ।

घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥

न कळे ब्रह्मादिकां करितां लाघव ।

योगियांची धांव खुटें जेथें ॥३॥

एका जनार्दनीं चेंडुवाचे मिसें ।

उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics