STORYMIRROR

Rajendra Bhoiwar

Classics

2  

Rajendra Bhoiwar

Classics

मेळवीं संवगडे खेळतसे

मेळवीं संवगडे खेळतसे

1 min
13.8K


मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी ।

शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥


सांवळां सुंदर वैजयंती हार । .

चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥


मुगुट कुंडले चंदनाचा टिळा ।

झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥


एका जनार्दनीं वेधलेंसे मन ।

नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Classics