STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

मिलनोत्सुक सरिता

मिलनोत्सुक सरिता

1 min
14.6K


सप्तरंगी इंद्र्धनु होऊनी 

उंच नभी मारू भरारी

सप्तरंगी रंगात रंगुनी जाऊ.

पुन्हा नव्याने एकरूप होऊ.

हाती हात तुझा, माझी साथ तुला 

क्षणिक सारं, दोन घडीचा डाव आपुला

भटकू सागर किनारी, वाळूचे घर बांधू

प्रेमाची नाती चल ग पुन्हा एकदा सांधू 

चल ग मनाचे लाड थोडेसे पुरवू 

व्याप, दुःख क्षणभर सारे विसरू 

निघते समयी हेवेदावे, रुसवे फुगवे 

हवे कशाला? सागरास अर्पुनी येऊ

प्रेमाची भाषा, मिलनाची ओढ 

सागरास बखुबी कळते

तेव्हांच दिगंताचा अखंड प्रवास करुनि 

मिलनोत्सुक सरिता सागरास येऊन मिळते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance