मिलनाची सांज
मिलनाची सांज
बघताच क्षणी तुला झाले कावरीबावरी
प्रीतीत तुझ्या अशी मोहरली शब्दांची वाटच अडखळली
नजरेने तुझ्या लाजून मी चुर झाली गाली
खुललेल्या अबोलीतूनच समजून घे ना माझी कबुली
कवेत तू घेता गेले मोहरूनी चेहरा ओंजळीत धरता गेले
शहारूनी तुझ्या रोखलेल्या नजरेत नजर गुंतुनी श्वासांच्या गंधात गेले
भान हरपुनी अलगद पसरती स्पर्शाची बोली अतूट होत जाती
तुझी मिठी स्पंदनांचा आवाज घुमे कानी प्रेमाचा रंग चढत जाई
गुलाबी ओठी शून्य अंतर दोघांत उरूनी अधीर मन गेले
तुझ्यात विरुनी मिलनाची सांज प्रेमरंगात
अशीच रंगावी तुझ्या अवकाशात मी अलगद विरघळावी

