मिळेल का ते बालपण
मिळेल का ते बालपण
निरागस असे ते बालपण होते
रम्य ते जीवनातील क्षण होते
ना कसली चिंता ना कसली फिकीर
मित्रांसोबत जगणे सोपे होते
आपणच आपले मालक होतो
निरागस,निष्पाप होऊन जगत होतो
मैत्रीच्या जगातले राजे होतो
मिळेल का रे देवा परत बालपण
आता नकोसे वाटते हे शहाणपण
धावपळीच्या या आयुष्यात विसरलो आहे हसणं
नकोसा वाटतो हा समजदारीचा मुखवटा
दूर गेल्या त्या गाव,नदी,मैदानावरच्या वाटा
संपून गेला आता आनंदाचा साठा
परत मिळेल का आता ते श्रीमंतीच बालपण
ते मुक्त पक्षापरी जगणं
मनमोकळ होऊन हसणं
