STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

मीच माझा भाग्यविधाता .

मीच माझा भाग्यविधाता .

1 min
3.3K


नसते किंमत गड्यानो  

सहजच जे काही मिळते 

ओलांडता दुःखाचा डोंगर 

सुखाची हिरवळ गवसते 

बाळ सानुले उठते, पडते,

धडपडते, धावू लागते

स्वप्न उराशी घेऊन झोपता

भविष्याची नाहीच चिंता

एवढं मात्र सत्य , स्वप्न त्यांचेच पूर्ण होतात 

ज्याच्याठायी हिम्मत, मेहनतिची जोड असते 

ते लाख पेरशील माझ्या वाटेवर काटे 

लढेन मी त्यांच्या नाकावर टिच्चून

स्वाती नक्षत्राचा थेंब क्वचित पडतो शिंपल्यात 

तेव्हा कुठे हिरा कोहीनूर.जन्मतो

दोष कुणाला कशास देऊ? जोर माझ्या मनगटी 

अन असेल मीच माझा भाग्यविधाता

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational