मी
मी
त्यांच्या परिघाबाहेर मी स्वैर मनस्वी तारा
भटकंतीने लागलेला परग्रहाचा वारा
चाललेला उत्तरासाठी त्यांचा प्रश्नांचा मारा
बांधील न मी कुणाला देई स्वातंत्र्याचा नारा
मी पणात गर्व अहम वाटे कुणाला धारा
आत्मभान नाही ज्याला माझ्याकडे नाही थारा
पाहुनी शरणागती सहज चढतो पारा
अलग ठरतो गर्दीत अघोषित दरारा
