मी तुझी सावली...
मी तुझी सावली...
मी तुझी सावली,तू माझी गुरुमाऊली
हाक तू ऐकली,हाकेला तू धावली
मी तुझी सावली,नवसाला तू पावली
तू पावलाेपावली,दावतेस सावली
मी तुझी सावली,तू माझा वटवृक्ष
तुझ्याच दृष्टीचा,मी बाळगला अक्ष
मी तुझी सावली,देतेस मला अभय
तुझ्याविना मी,कसा राहू निर्भय
