मी स्त्री....!
मी स्त्री....!


नकोशी तर नाव माझे,
माय बाप नाय पण दारिद्र्य सोबती होते..
लग्नाच्या बेड्या गळ्यात घालून संसाराचे धडे गिरवायचे होते
विसरली होती ही निष्ठुर माणसे की मी एक माणूस आहे..
पुन्हा पुन्हा स्वतःलाच विचारुन मीच आता थकले होते,
ही अशी माझ्याशीच का वागतात माणसे..
त्रिलोकात पूजनीय मी आज स्त्री म्हणून अपराधी वाटते,
पुन्हा निर्भया पुन्हा प्रियंका सारेच नकोसे वाटते..
कालपर्यंत मावळे निजले होते बहुधा,
कदाचित ती काळरात्र असावी..
आता मला कन्या झाली तर तिच
े मी काय करायचे?
ती विचारणार नाही ना?
ही अशी माझ्याशीच का वागतात माणसे..
मी देखील स'जीव आहे,
अबला नाही दुर्गा आहे,
Tension नाही तर 10 son एवढी माझ्यातही ताकद आहे
मग, का गं आई,
ही अशी माझ्याशीच का वागतात माणसे..
कावळा शिवला म्हणून एवढी दुषित झाले का गं आई?
मग वंशाच्या दिव्याचा अट्टहास तरी का असावा आई?
वंशाचा दिवा कावळा शिवल्याबिगर येईल का गं आई?
मग, का गं आई,
ही अशी माझ्याशीच का वागतात माणसे..