मी शेतकरी
मी शेतकरी
मी शेतकरी घाम गाळतो माझ्या रानात
जीव आहे माझं पिक पानात
दिवस रात्र मला पावसात भिजावं लागत
मग का माझ्याच कुटुंबाला उपाशी निजावं लागत
अनवान्या पायानी हिंडतो मी रपरपत्या उन्हात
जुने मळके फाटके कपडे का माझ्याच तनात
थंडीत उगडयावर झोपतो घेऊन फाटक घोंगडं
बायकोला देऊ शकत नाही नवी कोरी लुगडं
जगात मलाच का पाडतोस देवा तु उगडं
काय आहे माझ्या जीवनाचे खरे सार
प्रत्येक ऋतूच मलाच का झेलावे लागते भार
माझ्या आयुष्याचा असाच होत जातो -हास
कंटाळून आयुष्याला घ्यावं लागत मला गळफास
