मी राधा
मी राधा
का फुलावी प्रीत
अशी मना मनात
का दिसावी मूर्ती त्याची
अशी चरा चरात
डोळ्यात स्वप्न, ओठी नाम
त्याचेच का स्मरावे
का रक्तासम भिनावे
त्याने असे नसा नसात
ठाई ठाई त्याचेच अस्तित्व
का असे भासावे
गंध त्याचाच दरवळावा
का असा तना मनात
चांदण्या मैफिलीत
न्हाऊन असे निघावे
पहिल्या वसंतातील प्रेम
उमलावे जसे दवा दवात
काहूर उठता मनी का
स्मृती पटलावर तूच दिसावे
मोहन तू मी राधा दिसे मग
कणा काणात...

