STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Inspirational Children

3  

Bhagyashri Chavan Patil

Inspirational Children

मी पुस्तक

मी पुस्तक

1 min
252

किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

प्रत्येक दिवस छान जाईल असा विश्वास आहे माझा..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

बोलता येत नाही कायम सोबत राहील असा विश्वास आहे माझा.


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

संध्याकाळच्या चहा खारी च्या वेळेस सोबत करेन मी तुमची..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

 कुठे ही घेऊन जा नव्या गोष्टी सांगुन करमवणुक करेन तुमची..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

आठवणींचे गोड किस्से आठवून छानस हसु आणून देईन..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

नेहमी निस्वार्थ राहून फक्त द्यायचे कसे हे शिकवत जाईन..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

आज वाचलं काय उद्या वाचलं बदल जाणवू नाही देणार मी..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

कधी तक्रार करायची किंवा रागवायची संधीच नाही देणार मी..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात न बोलता गुपचूप राहीन..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

प्रत्येक वेळेस तुमच्या वाट्यास नवीन काहीतरी देत जाईन..


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

कधीच कश्याची कमी होणार नाही हीच खात्री राहील


किंमत खूप नाही माझी

मला आयुष्यात घेऊन तरी बघा,

प्रत्येक वेळेस तुमचा हक्काचा सवंगडी म्हणूनच साथ देईल..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational