मी काय पाप केलं..
मी काय पाप केलं..
स्मशानात जळणारं प्रेत मला म्हणालं
का जाळता रे मला मी काय पाप केलं ?
आई-बाप बायको मुलं मी यांच्या साठी जगलो
मेलो ही त्यांच्यासाठीच मी सर्वस्व अर्पिलं
सांगा मज तुम्ही मज कोणी काय दिलं ?
चित्ते वर ठेवण्याची तुम्ही केली की रे घाई
येणाऱ्या साठी कोणी थोडं थांबलं ही नाही
असं कसं तुम्ही मला सहज पेटवून दिलं..?
उरलो मी नाही माझी उरली फक्त राख
टाकलं रे मला तुम्ही जाळून टाकले खाक
विसरुन ही जाचाल तुम्ही सारं झालं गेलं..
कसं नाही वाटलं काही तुमच्या निर्जीव मनाला
मला नाही पटलं काही तुम्ही जाळताना मला
उरलो नाही मी जगात या मज तुम्हीच संपविलं...
थांबणार कोण आता सारे जाचाल निघून
होणार आता इथे मी बघा होणार राख जळून
म्हणाल बरं झालं गेलं इथे कोण राहायला आलं..
बघा असा आहे वाईट शेवट जीवनाचा
माणूस म्हणून जगावं नको मोह कशाचा
दुराचार सोडा आता करा नाही भलं.
