STORYMIRROR

Pappu Tekale

Classics

3  

Pappu Tekale

Classics

मी एकटाच होतो...

मी एकटाच होतो...

1 min
281

आयुष्य हे हसता-हसता जगता यावे

असे सांगणारा मी होतो...

एकांतात मात्र ढसा-ढसा

रडणारा हि मीच होतो....

सगळेचजण माझे आणि मी सगळ्यांचा

असे दाखवणारा मी होतो...

पण कुणीच कुणाचे नाही असे

सत्यात मानणाराही मीच होतो...

प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे माणसाने

असेही सांगत मीच होतो...

पण स्वतः मात्र प्रेमासाठी सतत

झूरत ही मीच होतो...

नशिबात काहीच नसतं ते प्राप्त करावं लागतं

असे बोलणारा मी होतो...

मात्र आरशात स्वतः कडे पाहून नशिबाला

कोसनारा ही मीच होतो...

संकटात आहेत मित्रपरिवार पाठीमागे...

म्हणून कचनार मी नव्हतो...

अस्तित्वात मात्र परिस्थितीशी त्या

झुंजणारा मी एकटाच होतो...

            मी एकटाच होतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics