STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Tragedy Others

2  

.प्रमोद घाटोळ

Tragedy Others

मी भारतवासी बोलतो

मी भारतवासी बोलतो

1 min
376

हे स्वातंत्र्या

हवं तसं भर सगळ्यांच घर 

पण माझा फक्त

किमान तरी भाव कर


प्रिय स्वातंत्र्या

साऱ्यांना झक्कं प्रकाश मिळू दे

पण माझ्या पणतीला

उजेड तर कळू दे 


बरं जाऊ दे स्वातंत्र्या

माझ असो काही

तू तर स्वतंत्र आहेस ना?

पुरेल मला ग्वाही


हे स्वातंत्र्या 

तू तर नाही ना कुणाचा गुलाम

माझी शपथ आहे तुला

हसत एकदा फक्त छाती ठोकून सांग !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy