STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मी भारतीय आहे

मी भारतीय आहे

1 min
240

मज नाही आकर्षण

परदेशी रहायचे

अभिमान भारताचा

मम मातृभूमी आहे


कला संस्कृती प्रगल्भ

संस्कारांचे जोपासणे

हाक अंतर्मनी मज

मम जन्मभूमी आहे


इतिहास आदर्शाचा

शौर्य धैर्य धाडसाचा

भूमी पवित्र इथली

नागरिक भारताचा


अभिमान भारताचा

जरी असोत उणीवा

आवडते साधे घर

प्रिय स्वामित्व जाणीवा


रोमरोमी देशप्रेम

जवानांच्या रक्तामधे

सोडूनिया घरदार

शिर तळहाती घेणे


मनामधे कृतज्ञता

माझ्या भरभरुनिया

भारत माझा देश आहे

मी नागरिक भारताचा


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Abstract