Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

मी बालकामगार बोलतोय

मी बालकामगार बोलतोय

1 min
837


काय देवा जिणं आलं, मला कष्टाला 

रम्य कसलं आलंय, बालपण माझं करपलं   (1)


उठल्याउठल्या कपड्यांचा, ढीग मला खुणावतो.

जरा काम थांबताच, मालक दरडावतो.  (2)


खणखणाट भांड्यांचा , चुकून कपबशी फुटे.

डोळे वटिरी मालक , वर पैसेही कापे.    (3)


बालकामगार कायदा , पुस्तकांतच रहातो.

कमनशिबी एखादा , कामातच अडकतो.  (4)


बालकामगार नाहीत , पाटी झळकते डौलात.

अकालीच मी प्रौढ , का रे असे नशिबात? (5)


ना पुस्तकातल्या गोष्टी , ना परी राणी आकाशात.

माझा आपला हुंदका , अडकतो घशात.  (6)


मला वाटते खेळावे , मौज करावी हुंदडावे.

बाबांनी लाड करावे, आईने कुशीत घ्यावे.(7)


अशी माझी दिवास्वप्नं, स्वप्नंच रहातात.

परिस्थितीचे चटके, मनाला पोळतात . (8)  


विटेवरच्या पंढरीराया, धाव घे माझ्यासाठी.

कधी येशील कृष्णा, मला सोडवण्यासाठी?   (9)


अशी माझी व्यथा , पाणावले ना डोळे !!

माझ्यासाठी कराल का काही, तुम्ही आगळेवेगळे ? (10)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy