मी अनुभवलेला पाऊस
मी अनुभवलेला पाऊस
का रे लपला ढगात!
शांत राहुन हळुच भिरभिरतो मनातुन.
संगीत गात राहतोस आपल्याच नादात.
मी मात्र खेळते , गिरक्या घेते या पावसाने....१..
स्वत:च गाणं घालून भिजवत असतोस.
माझ्या मनातल्या दुःखालाही कवटाळ राहतोस.
वेडा आहेस का रे तू! एकसारखा पडतो...
आम्हालाही प्रेमात भिजवतो...२
तहान भूक विसरून माझा प्रियकर भेटायला आला मला.
त्याची प्रेयसी भेटणार त्याला.
रोज तो येतांना कोसळतो बघवत नाही मला.
तो शोधत येतो भेटीला. ३..
नाही सांगत काही मनातल ,नुसता कोसळतो.
रडुनही सांगत नाही मनातल.
असा वागतो, प्रेम करते ना रे तुझ्यावर..
एक विचारु का तुला का रे पडतो एकसारखा.४.
वारा पाणी सोसवत नाही रे आता.
धीर धर ना रे थोडा.
घेवू दे कवेत आम्हाला .
असाच आनंद घेवू दे आम्हाला.५..
