कविता व्यथा स्रीची
कविता व्यथा स्रीची
तरणी ताठी गंगु गेली गांजुन गरीबीला
मुसमुसलेले अंग तीयेचे दाखवी जवानीला
झीगळ लावुनी वस्र नेसुनी अंग झाकीतसे
दारूड्या नवरा म्हणुन पोटासाठी जाय शेता
जवानी पाहुन मालक झाले गंगुवरती फिदा
म्हणे भारा टाकुनी ये जवळच माझ्या
हीच का रे माणसा वासना असे आता
स्रीची किंमत अशी असे का तुजला
उघड डोळे सावर रे तु आता
वेळी होई दुर्गा मी जगदंबा
करुन पूजा तीयेची वाचव तु आपणा
भोग वस्तु नसे ती आनंदी ठेवी सर्वा
आनंदाने जीवन देवुनी करु सन्मान तीयेचा
