शब्द मोती
शब्द मोती
1 min
171
शब्द शब्द होती मोती
हृदयात रक्त डोळ्यात पाणी
ओठांवर हसू आणते प्रिती
प्रत्येक हृदयाची हीच कहाणी
कधी मनातुन जीभेवर येतात
शब्द मोती काव्यात व्यक्त होतात
आधी मनात अडकतात
चारोळी काव्य, लेखात उतरतात
कल्पना कधी भावना येतात
शब्द मोती यांनी गुंततात
कधी मोती रंगभरीत कल्पना
आशेने मनातून कागदी उतरतात
ज्ञान मिळवा ज्ञान वाटा
आयुष्यात किर्ती मिळवा
ज्ञानाला दर्या सदा वाटा
शब्द शब्द मोती जुळवा
सागरातून येतात मोती शिंपले
काव्यामधुनी उमटती शब्द मोती
निघती तेथोनी जीवन ज्योती
प्रकाशीत करती कविमनाच्या
कल्पना किती
