मी आणि तू
मी आणि तू
मी प्रेम तुझ्या अंतरीचे,
तू भावना ओळखून पाहा,
मी मन तुझ्या डोहातले,
तू इच्छा होऊन पाहा...
मी चंचल झुळूक वाऱ्याचे,
तू सुगंध होऊन पाहा,
माझ्या हिरवेगार झाडांचे,
तू फुल होऊन पाहा...
मी ठिपके रांगोळीचे,
तू त्यांना जोडून पाहा,
मी प्राजक्त तुझ्या अंगणीचे,
तू गंध त्यांचा उधळून पाहा...
मी तप्त ऊन गगनाचे,
तू शीतल सावली होऊन पाहा,
मी मेघ काळे पावसाचे,
तू यात चिंब भिजून पाहा...