STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational Others

4  

Sangita Pawar

Inspirational Others

महिला दिन ती ---

महिला दिन ती ---

1 min
346

ती आदिमाया ती आदिशक्ती,

ती प्रिती ,ती भक्ती, ती युक्ती ||


अनेक रूपे अनेक सगुण-साकारते,

ती आदिम दोन पावलांनी विश्व व्यापते ||


ती अष्टभुजाधारणी होऊन,

प्रकाशती स्वकर्तृत्व दिशा दिशातून ||


ती पंखावरती आव्हाने पेलवते,

ती आत्मविश्वासाने अंतराळात झेपावते ||


ती गगनास गवसणी घालते,

ती तारखांचा हार घालते ||


ती आदिवासी पाड्यात ज्ञान फुलवते,

ती कारण्यसिंधू अनाथांची माय होते ||


ती घराघरात माणुसकी घडविते,

ती संसार नोकरीत कसरत करते||


ती रानावनात राब -राब राबते,

ती वसुंधरा होऊनी परोपकरिते||


ती बहिणाईच्या वाणीत सार सांगते,

ती सावित्री होऊन ज्ञान माला गुंपते||


ती मुक्ता होऊनी संत महती सांगते,

ती गार्गी ,मैत्रेयी याज्ञवल्कास हरवते||


ती लक्ष्मी राणी स्वातंत्र्याची मशाल होते,

ती आहिल्या बनून राज्य चालविते ||


ती जिजाऊ होऊन शिवबा घडविते,

ती लक्ष्मी पावलांनी घरा दरात वास करते||  


 *तुम्हीच सांगा सर्वांनी सध्या ती काय काय करते---??*

 *महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा-!!*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational