महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
दिव्यप्रकाशाच्या झोतात
हासत, नाचत आली दिवाळी
घरदार स्वच्छ करूनी मी
दारी घालते ठिपक्यांची रांगोळी...
पणती जरी लावली दारी
मिणमिणती ही छोटी जरी
प्रकाश देते सर्व ठिकाणी
तिमिरातुनी तेजाकडे नेते खरी...
दिवाळीला झाली सुरूवात
आनंदमयी वातावरण सगळीकडे
प्रातःकाली उठूनी दीप लाविले
दीपमाला खुलते चोहिकडे...
गरीबाघरी नेवू ज्ञानमयी दिव्यप्रकाश
ज्ञानज्योतीने दिवा लावू ज्ञानाचा
पणती पणती पेटवू अंगणी त्यांच्या
प्रकाशमान करू या सण दिवाळीचा...
आप्तजनांना भेटी देवूनी
निभवू जन्मांतरीची ही नाती
सौख्याचे, मांगल्याचे दीप लावू या
सगे, सोयरे आपले आनंदात राहती...
संस्कृती जपू या सारे मिळूनी
दिवाळसण साजरा करू या
मुलाबाळांना आनंद देवू या
ज्ञानदानाचे दीप ही लावू या...
