STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Inspirational Others

3  

प्रतिभा बोबे

Inspirational Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min
715

आहेत बहु , होतील बहु

परि या सम हा 

भारताच्या हृदयस्थानी विराजतो

महान माझा महाराष्ट्र हा


आंबा,शेकरु,हरियाल,ताम्हण

असती महाराष्ट्राची राज्य प्रतीके

पारंपारिक कला असे लावणी अन्

राज्यभाषा मराठी बोलती जन कौतुके


झाली निर्मिती १ मे १९६० रोजी

मुंबई राजधानी अन् नागपूर उपराजधानी याची

७२० किमी लांबीचा वरदान समुद्र किनारा

गोदावरी,कृष्णा,कोयना,भीमा फुलवती भूमी ज्याची


कोकण हा निसर्गरूपी स्वर्ग सजला

सातपुडा,सह्याद्रीच्या रांगांनी हा नटला

कळसूबाई सर्वात उंच शिखर यातले

नागमोडी सुंदर घाटांनी प्रवास सुखकर झाला


३६ जिल्हे ६ विभागात विभागले 

प्रत्येक जिल्ह्याने वेगळे वैशिष्ट्य जपले

गोंधळ,भारुड,अभंग, पोवाडा कला असती 

या पारंपारिक ज्याने मनामनांवर गारुड केले


शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाची

साक्ष देती गड अन् किल्ले

महाराष्ट्राच्या मर्द मराठ्यांनी

परतवून लावले किती परकिय हल्ले


संत,कवी,लेखक, कलाकार यांची

थोर कथा सांगतो महाराष्ट्र 

कबड्डी याचाराज्य खेळ जरी तरी 

सर्व खेळाडूंना कौतुकाची थाप देतो महाराष्ट्र.


माझ्या महाराष्ट्राची काय सांगू महती 

विविधतेत एकता हीच याची ख्याती 

माझ्या महाराष्ट्राचा आहे मला अभिमान 

महाराष्ट्र राखतो जगात देशाची शान



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational