महाराष्ट्राचा अभिमान
महाराष्ट्राचा अभिमान
माझ्या महाराष्ट्राची संस्कृती
आहे थोर खूप
हिच्या संगे नांदता
नाही आनंदाला माप
दऱ्याखोऱ्यांतून वाहे इथे
त्यागाचे गीत
परक्यालाही आपली म्हणे
अशी इथली रीत
रक्त सांडले मावळ्यांनी
मिळवले स्वराज्य
झुकला नाही शिवबा आमुचा
आणले रामराज्य
काय गावा गोडवा
उत्तुंग या संस्कृतीचा
मायमराठीचा असे अभिमान
गर्व मराठी असल्याचा!
