STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य

1 min
146

मराठी भाषा बोलणारं माझं महाराष्ट्र राज्य

लावणीची परंपरा जपणारं माझं महाराष्ट्र राज्य...


संतांची भुमी असलेलं माझं महाराष्ट्र राज्य

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवुन

स्वराज्य स्थापन केलेलं माझं महाराष्ट्र राज्य...


सण समारंभ उत्साहाने साजरं करणारं माझं महाराष्ट्र राज्य

स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या ज्योतीबा आणि सावित्रीचे माझे महाराष्ट्र राज्य...


महाड चवदार तळ्याचे पाणी सर्वांना मिळवून देणाऱ्या

संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे माझे महाराष्ट्र राज्य...


अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून

स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतला स्वातंत्र्य मिळवुन देणारं माझं महाराष्ट्र राज्य...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational