STORYMIRROR

Sonam Thakur

Inspirational Others

3  

Sonam Thakur

Inspirational Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
11.6K

तू आहेस जरी दगडांचा देश

परी तू परिधान करी साधू संतांचा वेश

मनांत कधीच नाही कोणासाठी द्वेष

थोरांच्या शौर्याचा इतिहास असे श्रेष्ठ


इथेच उगम पावती भीमा

इथेच घडतो संगम कृष्णा-कोयना

भक्तीचे इथे अभंग गाती

शौर्याचे किस्से सांगते माती


ही योगीयांची धर्म भूमी

ही पराक्रमाची कर्म भूमी


कोल्हापूर पंढरपूर असे

महाराष्ट्राची शान

इथे गड-किल्य्याना ही

मिळतो मान


महाराष्ट्राचा इतिहास 

साऱ्या विश्वात गाजतो

भगवा झेंडा माझा

डौलात आसमंती फडकतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational