STORYMIRROR

Smita Murali

Tragedy

2  

Smita Murali

Tragedy

महापुर

महापुर

1 min
281

आल्या सरीवर सरी 

पडे पाऊस बेफाम

अवलिया पावसाला

कोणी घालावा लगाम


पात्र नदीचे भरता

आला आला महापुर

सारे पाण्यात वाहून

डोळ्याआड गेले दूर


झाली जीविताची हानी

जिथे तिथे हाहाकार 

हात मदतीचे येता

बुडत्याचा तो आधार


झाले होत्याचे नव्हते 

कुठे मागावी हो दाद

माझे तुझे ना राहीले 

सारा संपलाच वाद


धडा शिकवी पाऊस

जेंव्हा होते अतिवृष्टी 

करा आपत्ती व्यवस्था

ठेवा नित्य दुरदृष्टी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy