महामारी
महामारी
कोरोना विषाणू सगळ्या जगात फिरला
मात्र प्राणी, पक्षी, झाडांना खूप घाबरला
जगात मानवाला त्याने लई हैराण केले
सजीव सृष्टीने त्याला तर लांब पळविले
ते आहे तसेच ताठ मानेने आजही निरोगी
पण मानवालाच का रे केले तू भयानक रोगी
सार्या जगात थैमान,अकांडतांडव माजविलेस
विश्वाला बेसहारा करून भंडावून सोडलेस
तेही सजीव आहेत आमच्या सारखे
तेही अन्नपाणी घेतात आमच्या सारखे
त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय
श्वसनाचे कार्य दिवसरात्र तर चालू हाय
आमची फुफ्फुसे कमजोर की काय
झाडे,वेलींची फुफ्फुसे भक्कम तर नाय
पक्षी,प्राणी यांना कोरोना आहे की न्हाय
याचा तरी तपास कोणी शास्रज्ञ करणार काय
मानवाचा काय गुन्हा ,ऑक्सिजनवर येतोय
प्रतिकारशक्तीसाठी इंजेक्शन लसीकरण करतोय
झाडांनो तुमची प्रतिकार शक्ती संपली नाही ना
पक्ष्यांनो तुम्ही तर जोमाने भरारी मारताय ना
मुक्या प्राण्यानों तुम्ही जराही दु:खी दिसत नाही
झाडांनो तुमचा आनंद जराही कमी झाला नाही
तुमची हिरवीगार,पाने,फुले,फांद्या सुंदर आहे
तुमच्या जगण्याचे रहस्य तरी काय आहे
कोरोनात गरीबांचे खूप हाल,हाल झाले
काहींचे संसार महामारीने भयानक संपविले
कुणाची आई,कुणाचा बाप अचानक गेले
असे दु:ख कित्येकांच्या वाट्याला आले
हंबरडा फोडून रडत अश्रू गाळत होते
ज्याचे जाते त्यालाच सारे अधूरे जगणे होते
मानव मानवाला मदतीचा हात पुढे करतोय
तरीसुद्धा माणूस हातातून कायमचा जातोय
