STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

3  

Savita Kale

Inspirational

महामानव

महामानव

1 min
11.7K

भिमाईच्या पोटी जन्मले

चौदावे रत्न भिमराव

प्रज्ञासूर्य महामानवाचे

जगी साऱ्या गाजते नाव


वर्गात बसुनी लाखो घडले

वर्गाबाहेर बसुनी ते शिकले

वाघिणीचे दूध प्राशन करुनी

साऱ्या समाजाला उद्धारिले


गलितगात्र झाले होते मन

समाज तो मुर्दाड झालेला

क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून

हक्कासाठी जागृत केला


समतेचा नवा मंत्र देऊनी

अस्पृश्यांना दिला सहारा

सत्याग्रह चवदार तळ्याचा

कर्मठांसाठी होता इशारा 


विद्येची तलवार घेऊनी

अन्यायाचे मस्तक छेदले

आत्मविश्वास देऊनी बांधवा

हक्कासाठी लढण्या शिकवले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational