महाभारत
महाभारत
एक ते महाभारत ज्यात
अर्जुनाचे सारथ्य केले स्वयंविधात्याने
आणि एक हे महाभारत
जे दररोज घडते आमच्या तुमच्या घरात,
गल्लीबोळात,बंदिस्त खोलीत अन मोकळ्या रानात
इथे नाही कोणी कृष्ण ना अर्जुन
पाळल्या जाते एकमेकांबद्दल
चिड असुया इथे आवर्जुन
पराकोटीचा गलिच्छपणा,कपटभाव,हेवेदावे
दिसतात ह्यांच्या कुत्सित वृत्तीत
भावाला भाऊ समजत नाही
बहीणीची माया उमजत नाही
लेकीच्या जीवाशी खेळतो कोणी
बायकोला वेठीस धरतो कोणी
रणधुुमाळी माजते इथे घराघरात
केवळ संपत्तीच्या हव्यासाने....
नाती उरतात फक्त नावापुरते
कितीही भेटले तरी मन कुुठे भरते
वंशाला दिवा हवा म्हणुन
नवससायास बोलतात कित्येकजण
जगात येण्याआधीच
मृत्युच्या दारी पोहचवतात तिला
तिच्या आर्त किंकाळ्यांनी हादरत नसेल का
यांचे मन....?
वाहत नसतील जरी पाट रक्ताचेे
तरी रक्तबंबाळ तिच्या भावना अन मन
हेही एक महाभारतच नाही का..?
