STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

मेघ पावसाळी.

मेघ पावसाळी.

1 min
701

मेघ पावसाळी आले

सुटलाय गार वारा

गाणे गाऊ पाहतोय

नील आसमंत सारा....


गडगडणारे ढग

माणसांची लगबग

इवल्याशा छत्रीखाली

लपायची तगमग.....


खळखळणारा झरा

छमछम नाचे थेंब

मोर फुलवी पिसारा

तृणाला फुटले कोंब....


डराव बेडूक करी

आले हो ते रस्त्यावरी

इंद्रधनू सप्तरंगी

वृक्ष डोली वार्‍यावरी....


मेघ पावसाळी आले

अारोग्य तेही सांभाळा

चौरसाहार हो घ्यावा

नित्य व्यायाम करावा....


आला हो पाऊस आला

वसुंधरा ती नटली

सृष्टी हो सजू लागली

प्राणीमात्र आनंदली.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational