STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

मैत्रीण

मैत्रीण

1 min
192

एक मैत्रीण हरवली आहे 

थोडी वेडी थोडी अल्लड 

तिच्या सारखी कोणीच नाही 

कारण सतत करी धडपड 


सदैव करे इतरांची काळजी 

आहे थोडी नाजूक परी

प्रेम तरी भरभरून वाहे 

जनु श्रावणातल्या सरी 


स्वतःच्याच धुंदीत रमणारी 

कायम राही स्वतःच्या विश्वात

सदैव आवडे तिला राहायला 

तिच्या गोड बालपणात 


मनात तिच्या नेहमी 

चालूच राही काही

वरून असली शांत 

मनात खळबळ राही 


देवा तिला नेहमी 

सुखात ठेव हीच इच्छा 

जन्मोजन्मी हीच मैत्रीण 

राहू दे हीच माझी सदिच्छा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract