STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

3  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
167

चल जाऊया कधी मैत्रीच्या गावा..

थकलेल्या मनाचा तो च एक विसावा...

खऱ्या मैत्रीचा कधी विसर न व्हावा..  

कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीचा महिमा किती महान..   

आपल्या मैत्रीने राखावा त्यांच्या मैत्रीचा मान..

मैत्री असते नात्यांपलिकडचे नाते...

अनोळखी मनांचे रेशीम नाते...

विश्वास आणि निःस्वार्थीपणा हा असतो मैत्रीचा पाया...

सुख-दुःखात दिलेल्या साथीने कळस चढविला जातो तिच्या पाया...

पैशाच्या संपत्तीने कधी कुणी श्रीमंत होत नसतो..

मित्रांच्या संपत्तीने मनुष्य आणिकच धनवान होत असतो..

र्धम,जात,पंथ यांच्या सीमारेषा मैत्रीसाठी नसतात... 

खरे मित्र मैत्रिणी आयुष्यभराची पुंजी असतात... 

रक्ताची नाती नशिबाने मिळतात... 

खरे मित्र मात्र सौभाग्याने मिळतात... 

जीवनात सर्वच नाती महत्वाची असतात...  

मित्र मैत्रिणी मात्र जीवनच असतात...  

कधी रुसवा,कधी समजूतदारपणा ...   

मैत्रीचे असे असंख्य रंग असतात....  

मैत्रीत करावी मुक्तहास्याची उधळण....  

मैत्री तर आहे मनांच्या नात्यांची मोहक आठवण...  

काळ बदलतो..मैत्री मात्र बदलत नसते...   

भेटी नाही झाल्या तरी ओढ मात्र थांबत नसते..   

मैत्री एकदा पककी झाली की ती तुटत नसते...   

म्हणूनच मनांनी साद दिली की..     

जावे कधी मैत्रीच्या गावा....    

थकलेल्या मनाचा तो च एक विसावा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational