STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
121

मैत्रीत सारं काही साफ असतं

थटृटा मस्करी माफ असतं


मैत्री म्हणजे नातं रक्तापलीकडचं

मैत्री म्हणजे दुःख ला मनमोकळी वाट करून देणारं

स्थान हक्काचं..


मैत्रीत नसते काहीही तुझे माझे

मैत्री म्हणजे नाते जिव्हाळ्याचे..


मैत्री असतेच जगावेगळी

जिवाला जीव देणारी असते ही निराळी


क्षणापुरता असतो अबोला

जोडलेली ही दोर मैत्रीची हृदयाला..


चुकलो कधी वाट तर मार्ग दाखवते मैत्री

हरलो कधी आयुष्यात तर हिंमत बनते मैत्री..


आपली गुपीतं जपणारी असते मैत्री

कधी चिडवणारी,कधी हसवणारी असते मैत्री..


भावनांचा बांध फुटता रडण्यासाठी खांदा असते मैत्री

रक्ताची नसुनही सख्खी पेक्षा कमी नसते ही मैत्री..


जपावी ती जिवापाड एकदा हरवली तर पुन्हा

मिळत नसते अशी जिवाभावाची मैत्री....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational