मैत्री
मैत्री
मनाचा विसावा वसे तिथे,
जिथे असते मैत्री...
नात्यांच्या बंधात गुंफलेलं,
जन्मांतरी चं नातं मैत्री...
आयुष्याच्या वाटेवरं लाभलेला,
एक अतरंगी प्रवास मैत्री.
जगण्याचा भक्कम आधार,
ती निखळ मैत्री...
सुख दुःखाच्या काळाचा,
सुरेख साथी मैत्री.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा,
साक्षीदार ती मैत्री...
आयुष्याच्या किनार्यावरची,
आनंदाची लाट मैत्री.
आई, बहिण, वडील, भाऊ
या सार्या नात्यांनी परिपक्व,
जगण्याची उमेद मैत्री...
