मैत्री जिवाला भेट देई मनाला
मैत्री जिवाला भेट देई मनाला
जीव गुंतला खेळ रंगला
मन नाचायला लागला
मैत्री जिवाला भेट देई ना मनाला
मैत्री मुळे मनाला मित्र वाटतो
मनातील दुख तिला सांगतो
किरण आशेचा दावीला
मैत्री म्हणजे होतो दिवा
हर्ष वाटे आपल्या जिवा
तिने जगण्यास अर्थ आणिला
मैत्री म्हणजे खट्टा मीट्टा
जसे पाणी पुरिचा रट्टा
तिने अंधार दुर सारिला
मैत्री असते तिखट मीठ मसाला
कसे सांगायचे जगाला
मैत्रीचा धर्म तिने पाळीला
मैत्री जिवाला भेट देई मनाला
प्रणोती शेंडे
