STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4  

Sunita Ghule

Inspirational

मैफिल

मैफिल

1 min
214

मैफिल


ऐन थंडीच्या दिसांत

उब शेकोटीची हवी

माय तुझ्या संगतीत

हास्य मैफिल फुलावी।


बालपण आठवता

मनी उब पाझरते

रम्य आतूर क्षणांना

 शब्दातून साकारते।


आनंदाच्या भरतीला

ज्वाला उजळून जाती

सुख अंतरी उमाळा

भाव मुखी विरजती।


अशा सोनेरी क्षणांचे

मोल अनोखे बालका

ओढ पाऊस थेंबाची

क्षुधा शमवी चातका।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational