मायेची ओंजळ
मायेची ओंजळ
मायेची ओंजळ
प्रेमाची साठवण
शुभेच्छांची तुजसाठी
केली उधळण
किती माया
करू तुजवर
जीव ओवाळून
टाकते निरंतर
तळहाती तुला
जपते अवांतर
साय मखमली
तरंगे दुधावर
प्राणांहून प्रिय
नात्यांचा मेळ
भरली वात्सल्याने
मायेची ओंजळ
काय तुजला
द्यावी प्रेमभेट
म्हणुनच घातला
काव्याचा घाट
ओसंडुन वाहती
असावी जवळ
सदा आनंदी
मायेची ओंजळ