माय सावित्री
माय सावित्री
माय सावित्री
तुझेच उपकार
या जगावर... !
तू ज्ञानज्योती
खरी प्रकाशज्योती
तू क्रांतीज्योती...!
माय सावित्री
केवढी महान स्त्री
जशी धरित्री...!
काळोख दूर
केलीस तू उध्दार
सूर्य भूवर ...!
समाजकार्य
तुझे महान धैर्य
माय सावित्री...!
जळली वात
अंधारी काळरात
तू ज्ञानज्योत...!
तुझीच स्फूर्ती
अगाध तुझी किर्ती
धन्य धरती...!
तुला वंदितो
तुजला मी पुजतो
माय सावित्री...!
तुझेच ॠण
गातो मी गुणगान
कोटी वंदन...
