'माय मराठीची किमया'
'माय मराठीची किमया'
माझ्या माय मराठीची गोडी,
नतमस्तक होऊनी हात जोडी,
मराठी आमुची आहे माय,
अमृतरुपी ज्ञान देणारी गाय,
तुकोबारायांची अभंगगाथा,
नकळत झुकतो आमुचा माथा,
एक एक शब्द बहुमोलाचे,
हिऱ्यामाणिकाहूनी बहुतोलाचे,
अखंंड विश्वाचे सामावलेे ज्ञान,
माय मराठीचा आम्हा अभिमान,
प्रेमाची हाक मराठी,
आदराचा धाक मराठी,
लाभला संतांचा वारसा,
उज्ज्वल भविष्याचा
राजमार्ग दाखविणारा आरसा,
ऊन-वारा सोसती मराठी,
असंख्य जीवांना पोसती मराठी,
माय मराठीची करूनी मनोभावे भक्ती,
आयुष्याचे सार्थक होऊनी मिळेल मुक्ती,
सर्वत्र उमटविला ज्ञानरूपी कर्तृत्वाचा ठसा,
माय मराठीचा जपूया वारसा.....
