माय माऊली
माय माऊली
धगीने तयाच्या येई अशी जाग,
माथी येऊनी ओकू लागला आग
बरसती जणू काही थेंब हे अंगारे,
तरी निघाली माय ही घेऊनी लेकरे
भरण्या खळगी अशी ही पोटाची,
अन भागविण्या तहान ती घोटाची
चिंता अशी हिला लेकरांची,
म्हणूनी साथ देई सावलीची
धन्य धन्य ती अशी माऊली,
जी लेकरांना देई पदराची सावली
