माऊली
माऊली
मनी ध्यानी चिंती |मुखी नाम हरी |
नित्य जप करी || वैकुंठीचे ||1||
आस दुजी नाही | चन्द्रभागा तिरी |
माऊलीच्या दारी | भेट व्हावी ||2||
डोळा नित्य वसे ! नीज रुप तूझे !!
चित्त हरे माझे | दर्शनाने !!3!!
वैष्णवांचा राजा ! नांदे पंढरपूरी !!
निर्गुणा धावरी ! हाकेपाठी !!4!!
खेळ सरू झाला ! मैत्रअसा लाभला !!
भेदाभेद गळला ! हरिहर !!5!!
सुखा नांदे धरा ! विष्णूची ति छाया !!
पंढरीची साया ! विठूराया !!6!!
आषाढी कर्तिकी ! मेळा या राऊळी !!
भेटीला माऊली ! जीव लागी !!7!!
येता राऊळीसी ! सांगे माऊलीसी !!
डावलू नकोसी ! अंतरीये !!8!!
कलयूगी नसे ! चित्त स्थिर कसे !!
नाम मुखी असे ! समाधानी !!9!!
असा देव संत ! दिव्यतेचा स्त्रोत !!
भाग्य ऊजाळत ! दर्शनाने !!10!!
लाभो तुझी छाया ! आभाळची माया !!
भर उन्हातया ! तू सावली !!11!!
आलो तुझ्या दारी ! भाव आलोचनी !!
माऊली लोचनी ! तू पांडूरंगा !!12!!
