STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

माता पिता सेवा(अभंग)

माता पिता सेवा(अभंग)

1 min
14.9K


जन्म झाला माझा । आई तुझ्या पोटी।

उपकार कोटी । झाले बहु।।१।।


सोसल्या गं कळा।सोसला गं भार।

कष्ट केले फार । माझ्यासाठी।।२।।


बाबांनी जपले।मला जीवापाड।

नजरेच्या आड। केले नाही।।३।।


स्वावलंबी,गुणी।संस्कारी, सक्षम।

जगी कार्यक्षम। केले तुम्ही।।४।।


असले महान।ठेविते मी जाण।

तुम्हामुळे मान।जगी मला।।५।।


करेन मी सदा।माता पिता सेवा

आयुष्याचा ठेवा।तोचि माझा।।६।।


केला आजवर।तुम्ही प्रतिपाळ।

करेन सांभाळ ।वृद्धपणी।।७।।


कातडीचे जोडे।केले मी जरीही।

फिटे ना तरीही ।ऋण त्यांचे।।८।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational