मार्ग
मार्ग
मनात जाळे डोळ्यात काळे
घातले तव जसे कुचके वाळे
क्षणोक्षणी बदलणारी वृत्त्ती
आधार देती वाईट प्रवृत्ती
बोलून सांगून नाही उपयोग
सांगणाऱ्याचा करती दुरुपयोग
घडवले कोण यांना असे
साधेसुधे नाहीत जन तसे
मार्ग काढणारा खोल बुडला
मार्ग अडविनारा हास्यात रंगला
