मार्ग माझा हा एकला
मार्ग माझा हा एकला
चालते मार्ग हा मी एकला
थांबायचे कुठेही नाही
अडथळे कितीही येता
वळायचे कदापि नाही
एकांत आला मार्गात की
स्वतःचा शोध घ्यायचा
सहज साध्य झाले तरी
स्वतःचा मार्ग निवडायचा
हा माझाच हट्ट आहे असे समजा
माझे सुख मी शोधण्याचा
याचना दुःखाची मी करता
सहज म्हणुनी येता जवळी
भोवतालची चक्रे फिरती येथे
सुखदुःख दिसे मज यापरी
माघार मला नाही घ्यायची
पळणे हा त्यातला मार्ग नाही
भासे मज हे सगळे सहजच
पुन्हा मज जगणे नाही
