मानवता...
मानवता...


माणसात माणुसकी मुळीच
का दिसेना पाहायला आज?
मानवतेचा जपूया धर्म
पेरु मानवतेचे बीज...
माणूस माणुसकीला आज
विसरुन हा गेला,
बिघडला जमाना लईच
माणूस हैवान हा झाला,
दिसे इथे प्रत्येकालाच
पैशाचा अती माज..
मानवतेचा जपूया धर्म
पेरु मानवतेचे बीज...
माणसात माणुसकी असावी
अमानुषपणा नसावा,
स्वर्गासारखा पवित्र
मानवी समाज दिसावा,
स्वार्थ नको मुळीच कशाचा
सारं सोडा तुझं माझं...
मानवतेचा जपूया धर्म
पेरु मानवतेचे बीज...
संकरीत औलाद जन्माला येती
आई-बापांचे जीव हे घेती,
स्वार्थी नि खोटी सारीच नाती
पशू झाले सारे, पाप झाले अती,
आई-बापांना ओळखिना कोणी
म्हणे वाटे त्यांची लाज...
मानवतेचा जपूया धर्म
पेरु मानवतेचे बीज...