माणूस?
माणूस?


माणूस हा किती हतबल होऊन जातो
जेव्हा तोच त्याचा वैरी होऊन जातो
थक्क होवून जाते हे मन तेव्हा
माणसाची विविध रूपे पाहायला मिळतात जेव्हा
रक्ताच्या थारोळ्यात लोटणारा हात हि त्याचाच असतो
आणि मदती साठी हि हात त्याचाच पुढे सरसावतो
चिमुकल्याचा पकडलेला हात त्याच्यापासून हिरावून घेतला जातो
आणि थकलेल्या खांद्यांवर झोपून त्यांचा आधार काळाआड निघून जातो
त्या चिमुकल्याला जीवनाचा पुढील प्रवास कोण बर दाखवील
कि चुकीची वाट धरून तोहि ह्या दलदलीत हरवून जाईल
ते थकलेले खांदे पुन्हा कधी सावरतील
कि आयुष्य वेचून मिळवलेले सुख क्षणभरात विरून गेलेले पाहून असेच झुकलेले राहतील
सर्वसामान्य माणूस ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत दुसरा दिवस जगायलाही लागतो
पण असे अघोरी कृत्य करणारा माणूस नवे चेहरे घेवून दररोज जन्माला येताच राहतो
स्वतःला बुद्धिमान म्हणवणारा माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कधी कधी पाऊसही पाडतो
पण हृदय हेलवणाऱ्या ह्या घटना पाहून त्याच्या ही डोळ्यात अश्रू तरळू लागतो