माणूस शोधतोय मी
माणूस शोधतोय मी
एकमेकांच्या मदतीला धावून जात होता
दुसर्यांच्या सुख-दुखात सहभागी होत होता
असा जीवाला जीव देणारा माणूस शोधतोय मी
सर्वांना समान न्याय देणारा अधिकारी होता
कोणापुढेही तो लाचार नव्हता
असा प्रामाणिक असणारा माणूस शोधतोय मी
दुसर्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत होता
गरीब व अनाथ जनतेचा सहारा होता
असा दुसर्यांचे भले जाणणारा माणूस शोधतोय मी
भ्रष्टाचाराचा त्याला तपास नव्हता
कामामध्ये पारदर्शकता बाळगणारा होता
असा कामामध्ये उत्तरदायित्व असणारा माणूस शोधतोय मी
समाजामध्ये परिवर्तनाची लाट पसरवणारा होता
स्वतःचा स्वार्थ मात्र त्याच्या मनात कधीच नव्हता
असा समाजाचे हित बघणारा माणूस शोधतोय मी
जनावरांचेदेखील अश्रू पुसणारा होता
स्वराज्यासाठी मरण आले तरी घाबरत नव्हता
असा निष्ठावंत असणारा माणूस शोधतोय मी
